भुईगाव


भुईगाव  :  आकाराने  व क्षेत्रफळानी सामवेदी  समजातील  सर्वात मोठे असे गाव म्हणजे  भुईगाव  होय , वसई  पासून  काही अंतरावर  भुईगाव  येते...

भुईगाव गावतील उपगावे व  आळी  :

                                                            १) भुईगाव  फाटा

                                                             २)
कुंभार   तलाव

                                                            ३) जोशी आळी

                                                            ४) पाटील  आळी

                                                            ५) मधली  आळी

                                                            ६) एखाद आळी 

                                                             ७)
सुपई  आळी

                                                             ८) जाप  आळी

                                                            ९) म्हात्रे  आळी

                                                          १०) सामिश्र आळी 


प्रसिध्द  ठिकाणे  :  १)  श्री जगद्गुरू शंकराचार्या  मंदिर  निर्मळ (भुईगाव ) 

                             
                              २) श्री  चंपा देवी  मंदिर  (भुईगाव ) :    
                         
                              ३) श्री स्वामी  समर्थ  मठ ( भुईगाव )

१ )  श्री  जगद्गुरू शंकराचार्या  मंदिर  निर्मळ  (भुईगाव )  : 



सामवेदी  समाजाची ओळख  या  मंदिरा  पासून होते.. 
फार  प्रसिध्द  व  फार  प्राचीन  असे या  मंदिराची ओळख  आहे ..
जवळ  जवळ  त्रेता  युगात  भगवान परशुराम  यांनी  विमलेश्वर  मंदिर  आणि विमला सरोवर स्थापाना  केली विमलेश्वर  मंदिर म्हणजे  आता  चे  श्री जगद्गुरू शंकराचार्या  मंदिर  निर्मळ   आणि  विमला सरोवर म्हणजे  आता  चे  निर्मळ  चा तलाव  होय.



 जगद्गुरू स्वामी  विद्यारण्य  यांनी निर्मळ  येथील विमलेश्वर मंदिरात कार्तिक चा  ११ व्या  दिवशी  महासमाधी घेतली ....
तेवा राजा जलौक  यांनी ओर्रिसा शिल्पशास्त्र  नुसार  एक मोठी समाधी बांधली,शंकराचार्य  हे  भगवान वल्लभा  याचे  शिष्य  होते..नंतर भगवान कृष्ण याचे  मंदिर  बांधले गेले  समाधी चा समोर,
त्या नंतर काश्मिरी ब्राह्मीन समजतील लोक  निर्मळ ला राहू लागली ....



त्या नंतर ३८व्या  जगत गुरूशंकराचार्य  स्वामी श्रीवनंदा सरस्वती यांनी भेट दिली सत्वाहन  राजा  राज्या  करत असतांना..
त्या  नंतर पुरी  चा  राजा  भीमसेन क्षत्रियया  ना  वेगळे करत असताना १०६व्या जगद्गुरू शंकराचार्य स्वामी सुखबोध  तिथ यांनी वसई  ला १३व्या शतकात  आगमन केले ..
 या  नंतर या ठिकाणा ला  १३व्या  शंकराचार्य श्रीन्गेरी शारदा पीथम यांनी  भेट  दिली ... व  त्याची  समाधी हम्पी  कर्नाटका  येथे आहे ...
त्या नंतर स्वामी विद्यारण्य ( स्वामी पदामंभा तिथं ) याचा शिष्या  ची विजय यात्रा चालू असताना ७व्या जगद्गुरू  शंकराचार्य गोवर्धन पुरी  हे वसई  ला विजय यात्रा चालू असताना आले ....



इ .स पूर्व १५४३ला  पोर्तुगिज नि बस्सेईन   वर राज्य  करायला सुरवात केली  आणि वसई  येथील धर्मांचा  नायनाट  करायला  सुरवात केली ..
पोर्तुगिजानी   पद्मनाभा  स्वामी  याचे चे  हिलोच्क  येथील  मंदिर , म्हणजे   आता चे  "निर्मळ  नाका " उद्धवस्त  करून  टाकले ...
तेव्हा  ब्रम्हींस ,शामेडीस , भंडारी ,जे जगद्गुरू शंकराचार्य  यांना आपले धर्म गुरु मनात होते ते खूप दुखी झाले पोर्तुगिज चा  या कायद्यांनी ....
त्यांनी पद्मनाभा  स्वामी समाधी ची दगडे  आणली  आणि विद्यारण्य स्वामी चा मंदिरा चा समोर आणून ठेवली या काळात  जवळ जवळ  २०० धार्मिक  स्तले उद्धवस्त  करून  टाकले  आली  बस्सेईन(वसई ) मध्ये ...
नंतर   वसई  चा  लोका  चा  सगण्या  वरून  पेशवा  चिमाजी आपा यांनी पोर्तुगिज वर हल्ला  केला आणि वसई  ला स्वतैत्र  केले १८व्या शतकात 


नंतर   चिमाजीआपा  चा  विनंती  वरून स्वामी विद्या शंकरा भारती जे करवीर संकेश्वर याचे  ८वे  वंशज  होते ते  जगद्गुरू शंकराचार्य  यांचे  शिष्य  सुद्धा  होते यांना वसई  येण्यास विनंती केली ...स्वामी विद्या शंकरा भारती यांचा सल्या नि चिमाजी आपा यांनी ओर्रिसा  शिल्प शास्त्र  नुसार
स्वामी विद्यानार्या आणि स्वामी पद्मनाभ तीर्थ , ५वे  & ७वे  पुरी  पीठमचे शंकराचार्य  यांची समाधी  दुरुस्त  केली ...



कार्तिक कृ. एकादशीला निर्मळ तिर्थात अंघोळी  आणि  द्वादशीला पालखी सोहळा अशी पूर्वापार परंपरा  आहे.
 इ.  स .पूर्व  ४०४  मध्ये   कार्तिक कृ. एकादशीला पुरीचे पाचवे जगद्गुरू शंकराचार्य विद्यारण्य स्वामींनी विमलेश्वराच्या मागे समाधी घेतली होती ,
तेव्हा पासून एकादशीला दूर दुरून(थेट गुजरात पासून अलिबाग)भाविक स्नानासाठी निर्मळला भेट देउन श्रीमद शंकराचार्यांच्या समाधीचे दर्शन घेत असतात.


द्वादशीला श्रीमद शंकराचार्यांच्या पादुकांची व विमलेश्वर महादेवाच्या प्रतिमेची पालखी काढण्यात येते.
पालखी मंदिराच्या पायरी कडील दक्षिण मार्गाने सुरेश्वर मंदिरामागुन-निर्मळनाका-गणेश मंदिर-हनुमान मंदिराच्या समोरून सकाळी समाधी मंदिरात पोहचते..

यात्रेच्या निमित्ताने कुटुंब प्रमुख मुलं मुलीना,लेकीसुनाना यात्राखर्चदेत असत.अशी प्रथा या परिसरात पाळली जात असे,  यात्रेमधे बाहुल्याचे खेळ,पाळणे,चकरी,हसरे आरसे, इ.मनोरंजनाचे खेळ असतात.

खेळण्याची,मिठाईची,सुकेळीची,खजुराची,शेंगाड्याची दुकाने असतात...

सध्या भांडीवाले,कल्हईवाले,बांगडीवाली,गोंदवणारी,गारुडी मंडळी कमी दिसतात, काळा बरोबर ही मंडळी दुसर्याह व्यवसायात गेली असावी... आजही यात्रा दहा दिवस चालते (पूर्वी १५ दिवस चालत  असायची ),
नालासोपारा, वसई स्टेशन,विरार,नाळे,गास,भुईगाव,पापडी,वसई गाव कडील मंडळी यात्रेला येतात त्यामुळे संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत यात्रेत गर्दी असते..




२) श्री  चंपा देवी  मंदिर  (भुईगाव ) :

 भुईगाव  येथील  फार जुने व    प्रसिद्ध  असे   मंदिर म्हणजे  श्री  चंपा देवी मंदिर  होय...या मंदिरची  स्थापना   दिनांक १२ / ५ /१९२१  रोजी करण्यात आली...
मंदिरामध्ये  चंपा  देवीची   मूर्ती स्थापन  करण्यात  आली आहे .....हि  देवी  म्हणजे   गावकर्याचे  श्रद्धास्थान  आहे....तसेच  ही  देवी म्हणजे भुईगाव  गावाची  ग्रामदेवता  मानली जाते..


गावातील  लोक  भक्तिभावाने  व  श्रद्धेने  देवीची पूजा अर्चना  करतात....
तसेच रितिरिवाजानुसार  गावात  अशी  परंपरा  आहे की  गावातील  कोणत्याही  मुलाचे  अथवा  मुलीचे  लग्न  असल्यास,
घरी मंडपात  लग्न  झाल्यानंतर  पुन्हा  परंपरेनुसार चंपा देवी  मंदिरात  पुन्हा लग्न लावण्यात येते ..


हि प्रथा  फार  पूर्वी पासून गावात  चालत  आली आहे...
तसेच  दर वर्ष  हनुमान जयंती ला येथे यात्रा भरते .. भाविक  चंपा देवीच्या   दर्शन  घेउन मग  यात्रेत  सामील  होतात..


 तसेच यात्रेमधे बाहुल्याचे खेळ,पाळणे,चकरी,हसरे आरसे, इ.मनोरंजनाचे खेळ असतात.
 खेळण्याची,मिठाईची,सुकेळीची,खजुराची,शेंगाड्याची दुकाने असतात... समाजातील  व  इतर  लोक  कुटुंबा  सोबत येते  यात्ररेस  येतात.. 



 ३) श्री स्वामी  समर्थ  मठ ( भुईगाव ) :  


भुईगाव  येथील   दुसरे  प्रसिध्द  ठिकाण  म्हणजे  श्री स्वामी  समर्थ  मठ होय.. या  मठाची ( मंदिरा ) ची   स्थापना  दिनांक १८/२ /२००८ रोजी  करण्यात  आली .. मठ (मंदिर ) हे  आधुनिक  शिल्पकला  व शास्त्रा  नुसार  बांधण्यात आले आहे,

 हा  मठ  भुईगाव  येथील  एखाद  आळी  मध्ये आहे .या  मठ  मध्ये अक्कलकोट स्वामी  महाराजाचे मुर्ती  आणि  पादुका ( मार्बल) स्थापन  करणात  आले आहेत ...
 या मठामुळे   समजतील  व इतर  लोकाना   जवळ च्या जवळ  स्वामी   समर्थाचे   दर्शन  घेणे   उपलब्ध  झाले आहे . तसेच  भाविकांसाठी  हा मठ  श्रद्धास्तान  बनले आहे ...
या मठा  द्वारे  विविध  सांकृतिक  आणि  धार्मिक  उपक्रम  आयोजित केले  जातात ...


या  वर्षीचे  उपक्रम आणि  कार्यक्रम  खालील  प्रमाणे  आहेत .....

1 comment:

  1. हा सर्व सांस्कृतिक ठेवा इथल्या गावांनी आणि गावकर्यांनी जपून ठेवला आहे. तो तसाच जपणे आणि पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करणे हे आपले सर्वांचेच नैतिक कर्तव्य आहे.
    ह्या सुंदर ब्लोग बद्दल मनापासून अभिनंदन!!

    ReplyDelete